
खोकला, सर्दी, श्वासावरोध आणि ॲलर्जीज् साठी आयुर्वेदिक उपचार
जीवनासाठी श्वसन ही अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे. आपण श्वास घेतो तेव्हा शरीरात प्राणवायू पंप केला जातो, आणि आपण उच्छवास सोडतो तेव्हा, कार्बन डायऑक्साइड बाहेर सोडला जातो. या कारणासाठी, श्वासोश्वास करताना जेव्हा जेव्हा आपण व्हायरस, विषाणू किंवा धूळीच्या कणांना सामोरे जातो, ते शरीराच्या आतून काढून टाकण्यासाठी रोगप्रतिकारक यंत्रणा लगेच अति सक्रिय होते.
रोगप्रतिकारक यंत्रणा श्वसन यंत्रणेतील श्लेष्माच्या स्वरुपात प्रतिसाद देते, जो त्याच्यातील बाह्य कण विरघळवतो, नंतर तो खोकला आणि सर्दीतून ते बाहेर फेकतो. याचा अर्थ ते वस्तुतः संरक्षण यंत्रणा आहेत ज्या आपली श्वसन यंत्रणा स्वच्छ ठेवतात.
त्यामुळे खोकला आणि सर्दी सोपे असल्यासारखे वाटते, पण ज्यांना त्यांचा दीर्घकाळ त्रास आहे त्यांच्यासाठी, आयुष्य दयनीय होऊ शकते. काम, सामाजिक जीवन, बाह्य कार्ये – काही असू दे, जीवनाच्या दर्जावर परिणाम होतो. आपल्याला ही समस्या शक्य असेल त्या उत्तम मार्गाने हाताळणे आवश्यक आहे.
आयुशक्ती जुनाट आणि तीव्र सर्दी, अस्थमा आणि रोगप्रतिकारकतेतील उणीवांच्या लक्षणांमधील विशेषज्ञ आहे. आम्ही जगभरातील हजारो लोकांवर जाणीवपूर्वक आहार, घरगुती उपाय आणि वनौषधींचा संयुक्तपणे वापर करून उपचार केले आहेत.
श्वसनविषयक समस्यांची सर्वात सामान्य कारणे आहेतः
- विषाणूंच्या किंवा व्हायरसच्या संसर्गाला सामोरे जाणे.
- धूळ, बुरशीचे कण, धुके, विशिष्ट खाद्यपदार्थ वगैरेंची ॲलर्जी.
- स्मोकर्स सिंड्रोम – जे लोक धूम्रपान करतात ते धूराच्या चुरचुरकारक परिणामामुळे खूप खोकतात, आणि त्याचा परिणाम श्वसनमार्गाच्या पेशींची हानी होण्यात होतो.
- धूर, धूळ, इतर प्रदूषके वगैरेसारख्या चुरचुरकारक घटकांना दीर्घकाळ सामोरे जाणे.
- शरीरातील रोगप्रतिकारकतेचा कमी प्रतिसाद.
या प्रवर्गात सामान्यपणे आढळणारे चार सामान्य आजार कोणते आहेत?
-
- सामान्य व्हायरस खोकला
जुनाट खोकला, घशाचा संसर्ग आणि खवखव, कानाचा संसर्ग.
- ॲलर्जिक श्वासावरोध आणि ब्राँकायटीस.
सामान्य व्हायरल खोकला
खोकला ही श्वसन यंत्रणेतील श्वासनलिकेतील केरकचरा स्वच्छ करण्यासाठी हवेची अचानक स्फोटक हालचाल आहे. ती फुप्फसांचे बाह्य कणांपासून संरक्षण करण्यात मदत करते. खोकला श्लेष्मा, कचरा आणि पेशींचे मिश्रण असलेला श्लेष्मा (शेंबूड) वर आणतो. तो तीव्र आणि जुनाट झाला तर त्याचा परिणाम श्वासावरोध, घोगरेपणा, गुंगी येणे आणि शीळेसारखा आवाज होण्यात होऊ शकतो. व्हायरल खोकला अत्यंत संसर्गजन्य असतो आणि सामाजिक समूहात पटकन पसरतो.
लक्षणेः
1. खोकणे, आवाजाचा घोगरेपणा.
2. घशाची खवखव.
3. मरगळ आणि शारीरिक वेदना.
4. संसर्ग नाकात पसरला असेल तर सर्दी.
तुम्ही औषध घ्या अथवा नका घेऊ, सर्दी साधारणपणे सात दिवसांत आपली आपणच बरी होते. खोकला दाबण्यासाठी तुम्ही घेतलेले काहीही निरुपयोगी आहे. वस्तुतः, दाबण्याने कफ कोरडा होतो, जो नंतर अनेक महिने साठून राहू शकतो.
श्लेष्मा आणि खोकणे श्वसन यंत्रणेतील संसर्ग आणि कण स्वच्छ करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. आपल्या यंत्रणेला श्लेष्मा पातळ करण्यात आणि सहजपणे बाहेर फेकण्यात मदत करणे ही आपण सात दिवसांची गैरसोय आणि त्रास कमी करणारी, करू शकतो अशी उत्तम गोष्ट आहे.
साचणे मोकळे करण्यासाठी आणि श्लेष्मा बाहेर फेकण्यासाठी या अत्यंत सुरक्षित आणि प्रभावी घरगुती उपायांचे पालन करा.
- 1. १/४ टीस्पून आल्याचा ताजा रस.
- 2. १/४ टीस्पून हळद पूड.
- 3. १/४ टीस्पून लसूण रस.
- 4. १/२ टीस्पून ताजा तुळशीच्या पानांचा रस.
- 5. २ टीस्पून मध.
- 6. काळी मिरी पूड १ चिमूट.
सर्व घटक चांगले मिसळा. तुम्ही मोठ्या प्रमाणात करणार असल्यास आणि पुन्हा वापरणार असाल तर ते रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा. वापरण्यापूर्वी ते खोलीच्या ताममानला आणण्याचे लक्षात ठेवा. हे मिश्रण दिवसांतून चार वेळा १-१/२ टीस्पून घ्या. मुले हे कफ मिश्रण सुरक्षितपणे घेऊ शकतात.
खोकला, सर्दी, श्वासावरोध आणि ॲलर्जीजसाठी आहार आणि जीवनशैली योजनाः
टाळा –
- 1. गहू, रिफाइन्ड गव्हाची कणीक, मांस, (खास करून लाल मांस), रिफाइन्ड साखर, खूप तळलेले पदार्थ. हे पदार्थ जठराग्नी मंद करतात आणि श्लेष्मा आणि विषारी पदार्थ निर्माण करतात.
- 2. सफरचंद, नासपती, जर्दाळू, चेरीज्, प्लम्स, स्वीट बेरीज्, ताजे अंजीर आणि खजूर, आंबे, पपई आणि डाळिंब अशी सर्व गोड फळे जी थंड स्वरुपाची असतात आणि अतिरिक्त श्लेष्मा निर्माण करतात.
- 3. दूध आणि दुग्धोत्पादने सुद्धा श्लेष्मा निर्माण करणारीच आहेत म्हणून टाळावीत.
- 4. बर्फ, थंड पदार्थ आणि पेये जठराग्नी लगेच “थंड करणारी” आहेत. ते अतिरिक्त स्लेष्मा सुद्धा निर्माण करतात. म्हणून ते टाळा.
तुम्ही जास्त खाऊ शकता असे पदार्थः शिजवलेल्या भाज्या जसे की भोपळा, स्क्वॅशेस, मारो, कुरगेट (तुराई), आयव्ही गौर्ड, तोंडली, पालक, मेथी, फरसबी, दूधी, शिराळी,, पडवळ, घोसाळी, मेंज-टॉउट, अस्पारागस, फेनेल (सुवा भाजी), स्वेडस्, मक्याचे दाणे, कांदे, गाजरे, पार्स्निप्स बीटरूट, सेलेरी, चिकोरी आणि लीक्स. बटाटे प्रसंगवशात त्यांच्या सालंसकट खाता येतील.
आरोग्यदायक आहाराचा डाळी हा अत्यावश्यक भाग आहे. मूग आणि स्प्लिट मूग बीन्स (हिरवा चणा), तुर डाळ (पिवळी डाळ) आणि मसूर डाळ (लाल डाळ) पचायला सोप्या, समतोलक आणि शरीराचे पोषण करणाऱ्या आहेत. डाळींचे पूर्ण मूल्य मिळण्यासाठी त्या धान्याबरोबर (खास करून तांदूळ) खाव्यात.
तांदूळ, ओट, राय, मका, मिलेटस् (ज्वारी, बाजरी, नाचणी) राजगिरा, क्विनोआ, कामुट, स्पेल्ट, पोलेन्टा; मूलतः गहू आणि मैदा सोडून सर्व काही. या धान्यांपासून आणि बटाटे आणि बकव्हीटपासून सुद्धा बनवलेली पीठे सामान्य “पीठांना” पर्याय म्हणून उत्तम आहेत.
बदाम, अक्रोड, जर्दाळू, अंजीर, हेझल नटस् खारीक आणि मनुकांसारखी सुकवलेली फळे खाता येतील. प्रसंगवशात तुम्ही चिकन, टर्की आणि मासे (ताज्या पाण्यातले) असे पांढरे मांस खाऊ शकता.
तुम्ही डेरीच्या दूधाच्या जागी बदाम दूध, तांदूळ दूध, सोया दूध किंला ओट दूध घेऊ शकता.
अनुसरायची जीवनशैलीः
- 1. धूम्रपान संपूर्णपणे टाळा.
- 2. थंडी, धूळ, धुके आणि इतर प्रदूषकांना सामोरे जाणे टाळा किंवा तुमचे डोके, कान आणि नाक या सर्वांपासून संरक्षणासाठी झाका.
- 3. तुमच्या स्वरयंत्राला कमी बोलून विश्रांती द्या.
- 4. दिवसभर कोमट पाणी प्या, थंड नको.
- 5. तुळस, आले आणि पुदीन्याच्या पानांचा बनवलेला गरम चहा प्या.
- 6. रोजचा नित्यक्रम म्हणून व्यायाम आणि योग करा, कारण त्याने रक्ताची प्राणवायू वाहून नेण्याची क्षमता सुधारेल आणि राखली जाईल.
- 7. वर नमूद केल्याप्रमाणे चांगला समतोल आहार घ्या. याने शरीराची रोगप्रतिकारकता सुधारते, जी सर्व प्रोप्रायटरी आजारांमध्ये महत्त्वाची आहे.
- 8. ओल्या खोकल्यासाठी योगातील भास्ट्रिका, कपालभाती आणि उज्जयनी प्राणायामाच्या, कोरड्या खोकल्यासाठी शितली आणि सितकारी श्वसनाच्या तंत्राचा सराव करा.
शिफारस केलेल्या आयुशक्ती वनौषधी:1. दिव्यस्वास जीवन १ टॅब्लेट रोज दोन वेळा.
2. अस्थालॉक २ टॅब्लेटस् रोज दोन वेळा.
3. कफानो सिरप १ टीस्पून दिवसात ३-४ वेळा .
4. या वनौषधी प्रभावी असल्याचे २७ वर्षांपेक्षा जास्त सिद्ध झाले आहे. ती दुखणारा घसा शांत करतात आणि खोकल्याची, श्लेष्मा पातळ करण्याची आणि बाहेर फेकण्याची आणि साचणे मुक्त करण्याची काळजी घेतात.
5. आयुशक्ती डॉक्टरांशी बोलण्यासाठी, आताच टोल-फ्री क्रमांकावर कॉल करा. 18002663001
ॲलर्जिक सर्दी, नाकातील साचणे आणि सायनुसायटिस
सर्दी केवळ संसर्गानेच होत नाही तर ॲलर्जीने सुद्धा होते. गवत, तणे, झाडांचे परागकण, धूळ माइटस्, पेट्रोलचा धूर, कुत्रा किंवा मांजराचे केस, तसेच दूध किंवा शेंगदाणे यासारख्या पदार्थांना सामोरे जाण्याने तीव्र हिस्टामाइन प्रतिक्रिया निर्माण होते. हा प्रचंड श्लेष्मा निर्माण होण्याच्या स्वरुपातील रोगप्रतिकारक प्रतिसाद आहे, जो ॲलर्जिक कण काढून टाकतो. सामान्य सर्दीला शरीराचा प्रतिसाद तत्समच असतो. संसर्ग आणि ॲलर्जिक कण, दोन्हींना हा आपला रोगप्रतिकारक प्रतिसाद असतो.
ॲलर्जिक सर्दी, साचणे आणि सायनुसायटिसची लक्षणे काय आहेत?
- पुन्हा पुन्हा शिंका येणे.
- साचणे आणि ब्लॉकड् सायनस नंतर वाहते नाक.
- श्वसनातील अडथळा आणि नंतरचा शीळेसारखा आवाज यासह नाकपुडीचे ब्लॉकेज.
- डोकेदुखी, दोन्ही गालांत, डोळ्यांत, भुवयात वेदना ज्यानंतर ताप येऊ शकतो.
- काही वेळा कानात टोचणारी वेदना.
स्पुटमची तपासणी करून सर्दीचे कारण ओळखणे शक्य आहे. पिवळसर, हिरवट किंवा मातकट श्लेष्मा विषाणूंचा संसर्ग सूचित करतो; स्वच्छ आणि चिकट श्लेष्मा अन्न किंवा वातवरणीय ॲलर्जी सूचित करतो.
औषधांनी श्लेष्मा दाबून टाकण्याने चुरचुर आणि चालू राहणारे साचणे होते. उत्तम उपाय म्हणजे तुमच्या शरीराला रोगप्रतिकारक यंत्रणा मजबूत करून बळ देणे आणि त्यासह श्लेष्मा पातळ करणे आणि बाहेऱ फेकणे.
कधीकाळी, समजा दर ४-६ महिन्यांनी, होणाऱ्या सर्दीचा सामना करण्यात कोणतीही समस्या नाही. जेव्हा ॲलर्जिक सर्दी रोज किंवा दर आठवड्याला होते तेव्हा समस्या उद्भवते. ही स्थिती त्यानंतर पुनरावर्ती जुनाट सायनुसायटिसमध्ये बदलते, ज्यात सायनसेस (डोक्यातील हाडांच्या दरम्यानची जागा) प्रभावी श्लेष्मामुळे ब्लॉक होते.
आयुशक्तीने अशा अनेक प्रकरणांत प्रभावी वनौषधींनी मदत केली आहे. या वनौषधी रोगप्रतिकारक यंत्रणा उभारतात आणि मजबूत करतात, श्लेष्मा पातळ करतात, श्वसन सोपे करतात. साचणे मुळातून दूर केले जाते म्हणून ते सहजपणे परत येत नाही.
ॲल्रर्जीज, खोकला, सर्दी, ताप आणि सायनसपासून आराम मिळण्यासाठी; साचणे दूर करण्यासठी, सुलभ श्वसनासाठी जाड श्लेष्मा विरघळवणे आणि नैसर्गिकरित्या बाहेर फेकणे यासाठी उल्लेखनीय वनौषधी चहाः
- 1. १/२ टीस्पून ताजे आले चेचलेले.
- 2. १२ नग तुळशीची पाने ठेचलेली.
- 3. ३ नग काळी मिरी कुटलेली.
- 4. ३ नग वेलची कुटलेली ०३ नग.
- 5. ५ नग पुदिन्याची पाने ठेचलेली ०५ नग.
- 6. १/२ इंच दालचिनी.
- 7. १ १/४ कप पाणी.
- 8. १ टीस्पून किंवा चवीनुसार गूळ.
मिश्रण एकत्र करा आणि चहा बनवा. गाळा आणि दिवसांतून ३-४ वेळा प्या
सायनसपासून आरामासाठी:२ टीस्पून ओवा ग्रीडलवर भाजा. ओव्याचा वास नाहीसा होईपर्यंत धूर श्वासातून आत ओढा, नंतर ताज्या बियांनी ही प्रक्रिया पुन्हा करा. अशा प्रकारे ओव्याचा वास रोज पाच मिनीटे श्वासातून आत ओढा.
सायनस आणि साचणे गंभीर असेल तर, हा उपाय शक्तीशाली आहे:
- 1. १/४ टीस्पून लसूण रस.
- 2. २ टीस्पून पाणी.
खाली झोपा आणि प्रत्येक नाकपुडीत हे मिश्रण दिवसातून दोन वेळा १/२ टीस्पून सोडा. जळजळ होईल पण ते साचणे नाहीसे करेल तर लसूण कोणताही विषाणूंचा संसर्ग मारून टाकेल.
शिफारस केलेल्या आयुशक्ती वनौषधीःअस्थालॉक -२ टॅब्लेटस प्रत्येकी रोज – शीळेसारखा आवाज, साचणे, श्वासावरोध, ॲलर्जिक खोकल्यापासून परिणामकारकपणे आराम देतात.
डी-वायरो – २ टॅब्लेटस् प्रत्येकी रोज – रोगप्रतिकारकतेला नैसर्गिक जोम देणारा. नियमितपणे घेतल्यास, खोकला, सर्दी आणि ॲलर्जीची वारंवारता उल्लेखनीय कमी करतात.
जुनाट खोकला, घसा खवखवणे आणि कानाचा संसर्ग.
काही वेळा खोकला आणि घशाचा संसर्ग पूर्णपणे बरा होत नाही. नंतर श्लेष्मा नाकात आणि सायनसच्या भागात राहू शकतो. त्याचा परिणाम जुनाट खोकला, घशाची खवखव आणि कानाच्या संस्रर्गात होऊ शकतो. खालील लक्षणे पुन्हा पुन्हा होणे हगे रोगप्रतिकारकता कमी झाली असल्याचे चिन्ह आहे.
- 1. श्लेष्मासह किंवा शिवाय सतत खोकला.
- 2. घशाची खवखव आणि लालसरपणा.
- 3. आवाजातील घोगरेपणा.
- 4. कानात दुखणे आणि खाज सुटणे.
- 5. डोकेदुखी आणि अस्वस्थतेची भावना.
- 6. वास आणि श्रवण दोन्हीच्या कमी झालेल्या संवेदना.
आयुशक्तीने अशी अनेक जुनाट प्रकरणे, त्रस्त असलेल्यांना नवजीवन देऊन यशस्वीरित्या बरी केली आहेत.
घशाची खवखव आणि जुनाट कानाच्या संसर्गापासून आराम मिळण्यासाठी घरगुती उपायः
- 1. १० नग ताजी तुळशीची पाने.
- 2. २ काळी मिरी (अख्खी).
सकाळी रिकाम्या पोटी ते दोन्ही एकत्र चघळा, अर्धी चघळल्यावर मिश्रण पाण्याबरोबर गिळा.
तसे संध्याकाळी आणि झोपण्यापूर्वी रात्री पुन्हा एकदा करा.
एरंडेल तेलः रात्री, झोपण्यापूर्वी प्रत्येक नाकपुडीत कोमट एरंडेल तेलाचे २-४ थेंब टाका.
गोळी बनवण्यासाठी पुढील घटक एकत्र करा आणि दिवसातून ३ ते ६ वेळा चोखा.
- 1. १/४ टीस्पून हळद पूड
- 2. १/४ टीस्पून ज्येष्ठमध पूड
- 3. गोळी बनवण्यासाठी पुरेसा मध
घशाची खवखव आणि संसर्गापासून आराम मिळण्यासाठी आयुशक्ती वनौषधीः
- 1. तस्थालॉक टॅब्लेट २-२.
- 2. डी-वायरो टॅब्लेट २-२.
- 3. कफानो सिरप १-१ टीस्पून.
- 4. अँटीसेप्टा टॅब्लेट १-१.
ॲलर्जिक श्वासावरोध/अस्थमा आणि ब्राँकायटीस
रक्ताला आणि पेशींना अत्यावश्यक प्राणवायू आणणारी हवा फुप्फुसात पोचण्यासाठी मोकळा मार्ग, जीवनासाठी महत्त्वाचा आहे. जेव्हा श्वासनलिकेचा दाह होतो किंवा ब्राँकायटीस किंवा अस्थमाने ते ब्लॉक होतात, तेव्हा हा प्रवेश स्पष्ट परिणाम दाखवून कमी होतो, त्यामुळे त्यावर ताबडतोब उपाय करणे आवश्यक असते.
तीव्र ब्राँकायटीस हा श्वासनलिकेच्या अस्तराचा व्हायरल किंवा विषाणूंच्या संसर्गाने झालेला दाह असतो. तो सामान्यपणे आपला आपण उपाय करतो. जुनाट ब्राँकायटीसला तंबाखू, धूर, धूळ किंवा रसायनांना दीर्घकाळ सामोरे गेल्याने चालना मिळू शकते.
अस्थमा ही दाहाची स्थिती आहे ज्याचा परिणाम श्वासनलिकांभोवतीचे स्नायू घट्ट होण्यात होतो. त्याचा परिणाम, श्वासनलिकेच्या बंधनांसह नंतरची सूज आणि आकसण्यात होतो.
लक्षणांची तुलना :
ब्राँकायटीस | अस्थमा |
---|---|
खोकला | खोकणे, खास करून रात्री |
श्लेष्माची (स्पुटम) निर्मितीः स्वच्छ, राखाडी किंवा हिरवा | झोपेविना रात्री |
जरासा ताप आणि शिरशिरी व मरगळ. | शीळेसारखा आवाज येणे |
छातीतील अस्वस्थता. | श्वासावरोध/श्वास अडकणे |
व्यायामानंतर अशक्तपणा | |
छाती भरून येणे, दाब आणि वेदना |
श्वासनलिकेचा मार्ग मोठा करून अस्थमा दाबून टाकणे हे पुरेसे परिणामकारकही नाही किंवा दीर्घकाळ टिकणारेही नाही.
आयुशक्तीने संपूर्ण जगात अनेक लोकांना ब्राँकायटीस, अस्थमा आणि ब्राँकायल अस्थमाच्या संबंधात मदत केली आहे. हे लोक आता अस्वस्थ झोपेशिवाय आणि न संपणाऱ्या टॅब्लेटस् आणि इनहेलर्स वापरण्याच्या सततच्या गरजेशिवाय जगतात. त्यांच्या फुप्फुसांचे कार्य आणि रोगप्रतिकारकता सुधारल्याने त्यांच्या जीवनात प्रचंड सुधारणा झाली आहे.
आयुशक्तीचे उपचार अस्थमा, ब्राँकायटीस, जुनाट श्वसनविषयक समस्यांमध्ये कसे लाभदायक आहेत?
- 1. श्वासनलिकेच्या दाहात घट, परिणामी संपूर्ण श्वासनलिकेच्या ब्लॉकेजेसमध्ये घट.
- 2. छातीचे स्नायू आकुंचन पावण्यावर नियंत्रण.
- 3. श्वासनलिकेच्या मार्गात साठलेला श्लेष्मा विरघळवणे.
- 4. सर्वांगीण रोगप्रतिकारकतेत सुधारणा.
शिफारस केलेल्या आयुशक्ती वनौषधीः
स्वासवीन अस्थालॉक टॅब्लेट – श्वास अड़कण्यापासून आरामासाठी रोज दोन वेळा २ टॅब्लेटस्.
स्वासवीन कफानो सिरप – साचणे स्वच्छ होण्यासाठी रोज दोन वेळा २ टीस्पून.
स्वासवीन डी-वायरो – रोगप्रतिकारकता सुधारण्यासाठी रोज दोन वेळा २ टॅब्लेटस्.
आयुशक्ती अस्थाटॉक्स जुनाट श्वास अडकणे, ब्राँकायटीस, वारंवार खोकला, सर्दी व सायनसपासून आराम मिळण्यासाठी कशी मदत करते?
आयुशक्ती अस्थाटॉक्स हा ३-५ आठवड्यांचा सखोल पंचकर्म उपचार आहे जो श्वासनलिकेच्या मार्गातून कफ श्लेष्माचे ब्लॉकेजेस काढून टाकण्यावर लक्ष केंद्रीत करतो. रोगप्रतिकारकतेला जोम देऊन श्वसनविषयक वाहिनी मजबूत करतो जेणेकरून ॲलर्जीज् आणि संसर्गाची वारंवारता उल्लेखनीयरित्या कमी होते. अस्थाटॉक्स उपचारांतील कायकल्प वनौषधी वाहिन्यांना पोषण देण्यात आणि त्याद्वारे फुप्फुसांचे संरक्षण करण्यात आणि सहज श्वसनाचे प्रवर्तन करण्यात मदत करतात.