
वारंवार होणारी डोकेदुखी किंवा मायग्रेनचे अटॅक्स, मळमळ, उलट्यांचा कोणत्याही दुष्परिणामाशिवाय समुळ नाश करा.
शरीरातली अति ऊष्णता अतिरिक्त आम्लाच्या निर्मितीला कारणीभूत ठरते. हे आम्ल डोक्यापर्यंत जाते आणि तिथे बराचकाळ राहिल्यामुळे जळजळीला आणि रक्तवाहिन्यांना सूज येण्यास कारणीभूत ठरते. चुकीचा आहार, अति ऊष्णता, सूर्यप्रकाश किंवा तणावासारख्या शुल्लक कारणांमुळे चालना मिळून ही ॲसिडिक ऊष्णता बळावू शकते आणि त्यामुळे ठोके पडल्याप्रमाणे वेदना होते आणि शेवटी मायग्रेन किंवा डोकेदुखी उद्भवते. अनेकदा उलटी झाल्यानंतर, तुम्हाला बरे वाटते. कधी कधी ही डोकेदुखी काही तासांनी आपोआप कमी होऊ शकते. बरेच लोक दररोज वेदनाशामक गोळ्या घेतात, त्यामुळे निव्वळ तुमच्या शरीरातली ऊष्णता वाढते, ज्यामुळे अखेरीस डोकेदुखी किंवा मायग्रेनची वारंवारता आणखीन वाढण्यात पर्यवसन होते.
कधीकधी, वारंवार उद्भवणा-या डोकेदुखीसाठी गंभीर आरोग्य स्थिती देखील ठळक कारण असू शकते. कामाचा किंवा घरातला निरंतरण तणाव मायग्रेनला कारणीभूत ठरतो. प्रकाश, सूर्याची तिरीप किंवा कर्कश्य आवाज मायग्रेनला चालना देतात. काही लोकांमध्ये, अत्तरांचे किंवा रंगांचे तीव्र सुगंध मळमळ, बेचैनी निर्माण करतात आणि अखेरीस मायग्रेनचा त्रास सुरु होतो.
आनंदी क्लायंट्सच्या यशोगाथा
आयुशक्तीमधल्या सात दिवसांच्या डीटॉक्समुळे तणाव, डोकेदुखी, वेदना आणि सूज येण्यापासून आराम मिळाला.
माझे नाव शैला सेठ असून मी ५६ वर्षांची आहे, मी गोरेगाव मुंबई येथे व्यवस्थापकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहे. मला कामामुळे अतिशय थकवा येत असे, तणाव देखील जाणवत असे आणि वारंवार डोकेदुखीचा देखील त्रास होत असे. मी इथे आयुशक्तीमध्ये सात दिवसांचा प्रोग्रॅम घेतला, तो अतिशय उत्तम होता. मला शिरोधारा दिली जायची. गेल्या काही महिन्यांपासून असलेल्या माझ्या डोकेदुखीच्या त्रासाला घालवण्यासाठी ती अतिशय सुयोग्य ठरली. शिरोधारेनंतर मला खुपच हलके वाटायला लागले आहे. माझी डोकेदुखी आधीपेक्षा ६५%हून जास्त प्रमाणात कमी झाली आहे. प्रोग्रॅममधले इतर अनेक उपचार अतिशय आरामदायक आणि ताजेतवाने वाटणारे आहेत. दरवेळी माझ्या हातांना आणि पावलांना सूज येत असे. मला माझे हातपाय हलवता देखील येत नसत. उपचार घेण्याच्या ४-५ दिवसांच्या आतच मला चांगला गुण आला. माझे आयुष्य तणाव मुक्त केल्याबद्दल आयुशक्तीची मी अतिशय आभारी आहे.
वारंवार होणा-या डोकेदुखीपासून ७०% आराम
मी २रीमध्ये असताना मला शाळेतून घरी आल्यावर जवळपास रोज डोकेदुखीचा त्रास होत असे. सप्टेंबर २००४मध्ये, मला डॉ.नरम यांची आयुशक्तीमध्ये भेट घेण्याचा सल्ला मिळाला; माझी बहिण आधीपासून आयुशक्तीचा उपचार घेत होती. मग मी आयुशक्तीला संपर्क केला आणि दिलेली औषधे घ्यायला सुरुवात केली. १-२ वर्षांमध्ये माझ्या डोकेदुखीची वारंवारता ७०%नी अगदी लक्षणीयपणे कमी झाली. माझी उंची आणि वजन देखील थोडेसे वाढले. आशिष, मुंबई
१५ वर्षांचे मायग्रेनचे दुखणे आणि आरोग्याच्या इतर समस्यांपासून मला अतिशय उत्तमपणे आराम मिळाला.
कतारच्या रेमिखिजेंना मायग्रेन, अपस्मार (एपिलेप्सी) आणि सांध्यांचा १५ वर्षांहून जास्त काळापासून त्रास होत होता. आयुशक्तीच्या डाएट आणि हर्बल उपचारामुळे त्यांच्यामध्ये अमुलाग्र बदल झाला. अपस्मार (एपिलेप्सी) आणि मायग्रेनचे अटॅक्स येण्याची वारंवारता कमी झाली. १५ दिवसांच्या सूपर डिटॉक्स उपचारांसोबत, त्या त्यांचे वजन कमी करु शकल्या. त्यांची शारीरिक आणि मानसिक स्थिती सकारात्मकपणे सुधारली.
मायग्रेन आणि पित्तापासून त्यांना सहा महिन्यांच्या आत आराम मिळाला.
मी गेल्या काही वर्षांपासून मायग्रेन व पित्ताने त्रस्त होतो. आयुशक्ती हर्बल औषधे व डाएटच्या सहा महिन्यांच्या आत, माझ्या मायग्रेन आणि पित्ताचे प्रमाण अगदी लक्षणीयपणे कमी झाले आहे. मी पुढचे सहा महिने डाएट आणि औषधी सुरु ठेवल्या आणि मला संपूर्ण आराम मिळाला. माझी बायको हाय ब्लड प्रेशर आणि कॉलेस्ट्रोलसाठी ॲलोपॅथिक औषधे घेत होती. आयुशक्तीचे डाएट आणि औषधी वापरण्यामुळे तिला तिचे ऍलोपॅथिक डोस थांबवण्यात मदत मिळाली आणि आता ती कोणतीही औषधे घेत नाही. तिचे हाय ब्लड प्रेशर आणि कोलेस्ट्रोल नियंत्रणामध्ये आहेत. अशोक मानवानी.
मला आता कोणत्याही ॲलोपॅथिक औषधोपचाराची आवश्यकता नाही. मला सायनस आणि डोकेदुखीपासून सुटका करुन घेण्यात आयुशक्तीने मदत केली.
मला नाक चोंदण्याचा(नोज ब्लॉक), सायनस आणि डोकेदुखीचा गेल्या २-३ वर्षांपासून त्रास होत होता. मला आयुशक्तीबद्दल माहिती मिळाली आणि उपचारासाठी मी इथे आले. मी रोज ॲलोपॅथिक औषधे घेत असे, पण इथे आल्यावर ती ती घेणे पूर्णपणे थांबबले, कारण आता मला त्यांची अजिबात आवश्यकता नाही. मला आयुशक्ती औषधींची शिफारस केली गेली आणि त्यांचा माझ्यावर जबरदस्त प्रभाव पडला. आज मी १००% बरी झालेली आहे आणि त्यांच्या उपचारांनी मी अतिशय समाधानी आहे. सिमरन मुंबई
डीटॉक्स पंचकर्मामुळे पित्त आणि मायग्रेनमध्ये कमालीचा आराम मिळाला आहे.
मी काही वर्षांपासून पित्त आणि मायग्रेनने त्रस्त होते. माझे पोट अतिशय दुखायचे; मी अनेक ॲलोपॅथिक औषधे घेतली, पण अजिबात आराम मिळाला नाही. मला माझ्या एका नातेवाईकांकडून आयुशक्तीबद्दल समजले. त्यामुळे मी इथे पंचकर्म उपचार आणि औषधे सुरु केली. ३-४ महिन्यांमध्येच मला माझ्यात फरक जाणवत आहे. आता पोट दुखत नाही, पित्तसुध्दा जवळपास नाहीसे झाले आहे आणि डोकेदुखी देखील राहिलेली नाही. मी आयुशक्तीची आभारी आहे गीथा, भारत
आयुशक्तीचे उपचार कशाप्रकारे काम करतात?

आयुशक्तीचा ट्रिटमेंट प्लान कस्टमाइझ डाएट, स्वयंपाकघरातले उपचार, प्रभावी हर्बल उपाय, सिध्द केलेले मर्म (आयुर्वेदिक प्रेशर पॉइंट्स) आणि प्राचीन डिटॉक्स उपचार.
पहिला टप्पा: काढून टाका
ब्लॉकेजेस, दाह नष्ट करतो आणि गटमधून आणि पेशींच्या अंतर्भागातून, योग्य प्रकारच्या निर्विषीकरणातून विषे काढून टाकतो जेणेकरून हानी झालेल्या अवयवांना योग्य रक्त पुरवठा होईल आणि पेशींच्या अंतर्भागातील विषारी पदार्थ स्वच्छ होतील.
दुसरा टप्पा: पुनर्संचयित करा
सर्व अवयव, खास करून आजारपणामुळे परिणाम झालेले, शक्तीशाली घरगुती उपाय, पथ्य, जीवनशैलीतील बदल, मर्म दाब बिंदू यांच्या वापराने दुरुस्त करणे आणि त्यांचे सामान्य कार्य पूर्ववत करणे.
तिसरा टप्पा नूतनीकरण करा
हानी झालेल्या आणि कमकुवत उतींवर वनौषधी फॉर्म्युले आणि औषधोपचार वापरून पायरी पायरीने पुन्हा उभारणी आणि नूतनीकरण, अशा प्रकारे चैतन्यशाली तारुण्यपूर्ण आरोग्य आणि जुनाट आरोग्य समस्यांपासून दीर्घकाळ टिकणारा आराम निर्माण करणे.
डोकेदुखी आणि मायग्रेनसाठी आयुशक्तीच्या सिध्द केलेल्या उपचारांमुळे तुम्हाला कोणते लाभ मिळतील?
1. शरीरातील अतिरिक्त ऊष्णता प्रभावीपणे कमी करते
2. पचन प्रभावीपणे सुधारते आणि रक्ताचे शुद्धीकरण करते
3. लक्षणीयपणे मान, खांद्याच्या चेतांच्या होणा-या दाहापासून अतिशय आराम मिळाला सोबत तणावामुळे होणारी डोकेदुखी देखील कमी झाली.
4. मळमळ, उलट्या, ठोके पडल्याप्रमाणे होणारी वेदना, बेचैनी आणि तणाव
5. ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवते आणि झोपेचा दर्जा सुधारण्यामार्फत डोकेदुखी किंवा मायग्रेनची वारंवारता कमी करते.
6. डोक्यामधल्या पेशींच्या कार्याला पुन्हा ताजेतवाने करुन आराम देते, अशाप्रकारे मायग्रेन किंवा डोकेदुखीच्या मूळ कारणापासून आराम देते.
तुमच्या आरोग्यात परिवर्तन करण्यासाठी ३ कृतींच्या पायऱ्या आमच्या आय़ुर्वेद तज्ज्ञाशी सल्लामसतलत करा

आमच्या आयुर्वेद तज्ज्ञाशी व्हिडीओ/समोरासमोर सल्लामसलत

तुमची सुटसुटीत आहार योजना तुमचे आरोग्य सुधारण्यात ५०% भूमिका बजावते.

तुमचे सुटसुटीत वनौषधी फॉर्म्युले आणि विषहरण योजना दीर्घकाल टिकणाऱ्या आरोग्यासाठी उल्लेखनीय परिवर्तन निर्माण करते.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
मायग्रेन आणि डोकेदुखी सारखेच असतात का?
मायग्रेन हा मेंदूच्या चेतातंतूंचा दाह किंवा सूज येण्यामुळे होणारा चेतासंस्थेशी निगडीत आजार आहे. डोकेदुखी हे मायग्रेनचे फक्त एक लक्षण आहे
मला सायनस आणि डोकेदुखीचा त्रास आहे. त्यांचा आपसात काही संबंध आहे का?
सायनसमुळे होणारी डोकेदुखीचा त्रास सर्वत्र पसरतो. तुम्हाला तुमचे डोळे, गाल आणि कपाळाभोवती वेदना आणि दाह जाणवतो. कधीकधी डोक्यामध्ये ठोके पडल्याप्रमाणे वेदना होतात. जर सायनसचा उपचार केला गेला नाही, तर त्यामुळे मायग्रेन देखील होऊ शकतो.
मान दुखणे किंवा खांदेदुखीमुळे तीव्र डोकेदुखी कशी उत्पन्न होऊ शकते?
मानदुखी किंवा खांदेदुखीमुळे, तुमच्या नसा दाबल्या जातात आणि रक्ताभिसरण कमी होते.. तुम्हाला दाहामुळे मानेच्या बाजूंना लहान लहान गुठळ्या होतात. डोक्याच्या किंवा मानेच्या मागच्या भागापासून वेदनेला सुरुवात होते. नंतर हळूहळू एक किंवा दोन तासांमध्ये ती डोक्यापर्यंत आणि डोळ्यांच्या मागच्या भागामध्ये जाणवू लागते. मान, कान, डोळयांच्या आसपास तुम्हाला ठोके पडल्याप्रमाणे वेदना जाणवते आणि ती बहुतांशवेळा बराच काळ असते. अशाप्रकारची वेदना विशेषत: डोक्याच्या एका किंवा दोन्ही बाजूंना होते.
दिवसा बरेचवेळा, सकाळी जेव्हा मी उठतो/ते तेव्हा मला हलकी डोकेदुखी का जाणवते? ती कायमस्वरुपी बरी होऊ शकते का?
अशी वेदना झोपण्याच्या स्थितींमुळे आणि ब-याच स्थितींमध्ये मज्जातंतूंच्या (नसा) चिमट्यामुळे होऊ शकते हे टाळण्यासाठी मऊ उशा वापरा. तसेच, कमी प्रमाणातल्या झोपेमुळे अनेक लोकांना सकाळी मळमळ आणि डोकेदुखी होऊ शकते. रोज सकाळी मानेचे थोडे व्यायाम आणि चांगली झोप घेतल्याने अशा वेदना आणि डोकेदुखीपासून आराम मिळू शकतो.
जेव्हा मी उष्ण वातावरणात बाहेर जातो/ते तेव्हा मला तीव्र डोकेदुखी होते. हे कसे थांबवता येईल?
उष्ण हवामानामुळे शरीरात अधिक उष्णता निर्माण होते आणि त्यामुळे निर्जलीकरण होते. रक्तवाहिन्या अरुंद झाल्यामुळे आणि निर्जलीकरणामुळे डोकेदुखीचा त्रास होतो. तुम्ही स्वतःला हायड्रेट करताच, तुम्हाला बरे वाटू लागते आणि आराम मिळतो.
पित्तामुळे डोके दुखू शकते का?
हो. जेव्हा तुमच्या पोटात अतिप्रमाणात पित्त तयार झाल्यामुळे पचनक्रियेत अडथळा निर्माण होऊन शरीरात जास्त उष्णता निर्माण होते. पित्तामुळे पोटात जळजळ आणि वेदना देखील होऊ शकतात आणि तुम्हाला डोकेदुखी जाणवू लागते. पित्तावर नैसर्गिक औषधी आणि डाएटसह उपचार केले की तुमची डोकेदुखी देखील नाहीशी होईल.